नेवासा – नेवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून, तालुक्यातील एकूण ८१ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले असून शासनाकडे ७८ हजार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. उर्वरित बँक खाते, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातत्याने जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला. आ. लंघे यांच्या सतर्कतेने नेवासा तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सरसकट पंचनामे करण्यात आले. या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १२० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती लंघे यांनी दिली.

काही शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे, बँकेच्या त्रुटी, केवायसी आणि आधार लिंकिंग अभावी थांबलेले असले तरी लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील, असे स्पष्ट करत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रशासनाशी संपर्कात असल्याची माहिती आ. लंघे यांनी दिली. शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामध्ये २ हेक्टरपर्यंत राज्य शासन आणि १ हेक्टरपर्यंत केंद्र शासनाकडून अनुदान वितरित करण्यात येणार आहे. अनेकांना अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
बँक खात्याच्या त्रुटी, आधार कार्ड लिंक नसणे इत्यादी कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीमुळे डाटा अपलोड करतांना अडचणी येत होत्या. त्याही अडचणी आता दूर करून डाटा अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे.
– डॉ. संजय बिरादार, तहसिलदार, नेवासे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

