गणेशवाडी – सोनई- राहुरी रोडवरील वंजारवाडी बस स्टँड येथे झालेल्या अपघातात वडिलांसह चिमुरडीचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे . तर आई व मुलगा जखमी झाले. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २७ रोजी राहुल नवनाथ पाटोळे (वय.३२) हे आपली पत्नी सोनाली राहुल पाटोळे, मुलगा चैतन्य राहुल पाटोळे, व मुलगी रिया राहुल पाटोळे हे धनगरवाडी येथील आपल्या सासुरवाडीला गेले होते.

ते पुन्हा आपल्या ब्राम्हणी गावी येत असताना वंजारवाडी येथील बस स्टॅण्ड चौकात एका चार चाकी वाहनाची पाटोळे यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली .त्यामध्ये राहुल पाटोळे व मुलगी रिया राहुल पाटोळे (वय.५) यांचा करून अंत झाला. तर आई सोनाली व मुलगा चैतन्य हे दोघे जखमी झाले. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
राहुल पाटोळे यांच्या पश्चात आई वडील,पत्नी,मुलगा,दोन बहिणी असा परिवार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

