गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे विक्री साठी आणलेल्या गावठी कट्ट्यासह एक ताब्यात घेतला आहे. या बाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे किरणकुमार कबाडी, यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना झाले होते.

त्यानुसार दि २७ रोजी पथक हे परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारत सोपान कापसे रा. कांगोणी, ता. नेवासा याने गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर इसमाचा शोध घेता तो कांगोणी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. बातमीतील ठिकाणी जावुन नमुद इसमाचा शोध घेत असतांना भारत सोपान कापसे (वय २७) वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, कांगोणी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा मिळुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने दोन गावठी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी आणुन त्याचे राहते घरामध्ये ठेवलेले असल्याचे सांगितले. त्याच्या राहत्या घरामधुन ६०,०००/- रुपये किमतीचे २ गावठी पिस्टल (अग्निशस्त्रे) व ४०००/- रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुसे असा एकुण ६४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांचे फिर्यादीवरुन शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात येथे आर्म ऍ़क्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापुर पोलीस करीत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

