नेवासा – करजगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या (१९८६-८७) दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चार दशकांनंतर एकत्र येत भावनिक आणि अविस्मरणीय स्नेहमिलनाचे आयोजन केले. ‘मैत्रीचे हे नाते जुळले पुन्हा’ म्हणत, या स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे पन्नास माजी विद्यार्थी उपस्थित होते.
दहावीच्या शेवटच्या पेपरनंतर वेगवेगळ्या वाटा धरलेल्या या मित्र-मैत्रिणींची भेट झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात बालपणीच्या निरागस आठवणींचा भाव होता. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात फिरून, जुन्या वर्गखोल्या पाहून आणि मैदानात उभे राहून शालेय जीवनातील गमती-जमतींना उत्साहाने उजाळा दिला. चार दशकांनी भेटल्यामुळे एकमेकांना ओळखणे कठीण जात असल्याने, सर्वांनी आपला परिचय पुन्हा करून दिला व मनोगत व्यक्त केले. या भावनिक प्रसंगी, शालेय गुरुजनांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले, तसेच ज्या मित्रांचे व मैत्रिणींच्या पतींचे दुर्दैवी निधन झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याच कार्यक्रमात भाऊबीज सणानिमित्त उपस्थित भगिनी – सुनिता टेमक, परिगा जाधव, प्रा. अनिता ससे, आशा घावटे, सुनीता गवांदे (परिवेक्षिका), उषा धात्रक, शालन म्हसे, संगिता टेमक, संगिता पवार, मिना कंक, अलकनंदा माकोणे यांचा साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहबंध पुन्हा जोडण्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या आयोजकांचे सर्व उपस्थितांनी मनापासून आभार मानले आणि यापुढे अशा भेटी नियमितपणे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी डी.वाय.एस.पी. एकनाथ पाडळे, डॉ. संजय कंक, डॉ. दत्तात्रय घावटे, सुनिल घोलप सर, अॅड. प्रकाश बुऱ्हाडे, जालिंदर टेमक सर, हरिभाऊ बोरुडे सर, सुभाष पवार सर, राजेंद्र टेमक, संजय निपुंगे, कैलास साळुंखे सर, कांतीलाल देवखिळे, बाळासाहेब फुलसौंदर, नानासाहेब जाधव, दत्ता निपुंगे, भाऊसाहेब आरंगळे, प्रकाश पाटील, गोरक्ष माकोणे, सुनील पुंड, राजेंद्र राऊत, लक्ष्मण आयनर, नामदेव काळे, भिकाभाऊ जगताप, केशव औटी ,नानासाहेब पवार यांचेसह असंख्य मित्र याप्रसंगी उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पारंपरिक सनई वादनाच्या तालावर संपूर्ण बॅचने थिरकत आनंद व्यक्त केला. तसेच, विजय गायकवाड, एकनाथ जाधव व भाऊसाहेब जाधव यांनी सादर केलेल्या भावस्पर्श गायनाने वातावरणाला खास रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जाधव सर यांनी केले. यानंतर सामूहिक स्नेहभोजन करण्यात आले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

