मतदारयादी

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार घोषित प्रारूप मतदारयाद्यांच्या हरकती नोंदविण्याच्या अखेरच्या दिवशी १७ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. एकूण ७९२ हरकती आल्या. त्यांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. नगरपंचायत निवडणूकीची शुक्रवारी (दि. ३१) अंतिम प्रभागनिहाय मतदारयाद्या अधिप्रमाणित करुन अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहेत.

नेवासा शहरातील एकूण १७प्रभागांत प्रारूप मतदारयादीसंदर्भात नमुना अ व ब अशा ४ हजार १ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. यातील इतरांनी (नमुना ब) ७९२ हरकतींवर दि २७ व २८ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील व मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

मतदारयादी

प्रारूप मतदारयादीवर हरकती व सूचना दि. ८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान कालावधी दिला होता. हरकती दाखल झाल्या होत्या. मात्र, हरकतींवर चार दिवसांची मुदतवाढ दिल्याने १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत शेवटच्या दिवसा अखेर प्रारूप मतदारयादीसंदर्भात एकूण ४ हजार १ एवढ्या हरकती नोंदविल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक हरकती सुचना नमुना (अ) हरकती ३२०९ इतक्या असून, इतरांनी (ब) ७९२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या.

प्रभाग १ ते १७ प्रभागांसाठी आलेल्या हरकतीनुसार शहानिशा करण्यासाठी एक अधिकारी, एक लिपिक व कर्मचारी असे सहा पथक तयार करण्यात आले आहे.

हरकतीची पडताळणी करण्याचे काम मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आहे.

नगरपंचायत निवडणूकीची शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

मतदारयादी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मतदारयादी
मतदारयादी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मतदारयादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *