संत महंत ,शेतकरी ,वकील ,डॉक्टर,व्यापारी यांची जमली मांदीयाळी.
सोनई – माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सोनई ता नेवासा जगदंबा देवी मंदिर प्रांगण
येथे शुक्र दि 31 ऑक्टोबर रोजी
दिवाळी फराळ कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 3.30 या वेळेत
संपन्न झाला.
नेवासा तालुक्यातील विविध गावामधून गावांचे सरपंच, सदस्य,सोसायटी चेअरमन,संचालक, विविध संस्थाचे पदाधिकारी,विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी,,तरुण ,जेष्ठ, वकील, व्यापारी,डॉक्टर ,महिला भगिनी , पत्रकार यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थितांशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दीवाळी फराळा निमित्त संवाद साधत हितगुज केले.
याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की
सण समारंभातुन समाजात एकोपा साधला जातो .

विचारांची ,सुख दुःखाची देवाण , घेवाण साधली जाते.
भेटलेली माणसे समाजासाठी काम करण्याची उर्जा देतात. याप्रसंगी शिर्डी लोकसभेचे खा भाऊसाहेब वाकचौरे, महंत गणेशानंदगिरी महाराज,महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत अवेराज महाराज, ह भ प भगवान महाराज जंगले शास्त्री,ह भ प दिनकर महाराज मते, ह भ प ज्ञानेश्वर महाराज हजारे, ह भ प रामनाथ महाराज पवार, ह भ प चंद्रभान महाराज म्हसलेकर, ह भ प देविदास महाराज आडभाई, ह भ प भागचंद महाराज चावरे,
ह भ प लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, ह भ प निलेश महाराज रोडे, ह भ प गणेश महाराज चौधरी,
ह भ प गणेश महाराज आरगडे, ब्रम्हकुमारी उषा दीदी, ह भ प नंदाताई गवारे, ह भ प सविता दरंदले याप्रसंगी उपस्थित होते.
दिवाळी फराळ कार्यक्रमास 15,000 नागरिकांची उपस्थिती होती
उपस्थितांचे स्वागत जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, रामराव गडाख,प्रवीण गडाख यांनी केले.
माजी मंत्री शंकरराव गडाख हे सत्तेत नसतांना देखील दिवाळी फराळ कार्यक्रमास तालुक्यातील 15000 हजार नागरिकांची असलेली उपस्थित अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

