सोनई – सोनई पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दिवस ‘साजरा करण्यात आला. यावेळी सोनई पोलीस ठाणे ते जगदंबा मंदिरापर्यंत ‘एकता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, शिक्षक, पोलीस, पत्रकार व गावातील नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याचा सहभाग नोंदवला.
सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. माळी म्हणाले, सरदार पटेल यांनी देशभरातील सुमारे ५६२ संस्थाने भारतात विलीन केली.

यामुळे त्यांचे देशासाठी मोठे कार्य आहे. प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी आज सरदार पटेल यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी प्रास्ताविक केले. सोनई एकता दौडमध्ये प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. क्षितिजा इंगळे, डॉ. प्रज्ञा दराडे, पत्रकार संदीप दरंदले, प्रा. अशोक तुवर, प्रा. सुरेश जाधव, डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, डॉ. सुनील वाघ, डॉ. संतोष गुरसळ, रामकृष्ण आगळे, महावीर चोपडा सुनील बाराहाते सहभागी झाले. शनिश्वर विद्या मंदिरचे विद्यार्थी दौडमध्ये विजयी झाल्याबद्दल सपोनि विजय माळी यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. पोलीस हवालदार बाचकर यांनी एका विद्यार्थीनीला ट्रेकिंग शूज घेण्यासाठी एक हजार रुपये दिले. पोलीस कर्मचारी व सोनई आरोग्य केंद्रातील कर्मचारी सहभागी झाले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

