सोनई – धनगरवाडी ग्रामस्थ व महादेव बाबीरदेव सेवा ट्रस्ट, धनगरवाडी (सोनई) यांच्यावतीने महादेव बाबीरदेव यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.
यात्रेचा उद्घाटन सोहळा महादेव बाबीरदेव देवस्थान, आडभाई वस्ती, धनगरवाडी येथे पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन माजी सभापती सुनील गडाख यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संदीप कुसळकर व सखाराम राशिनकर उपस्थित होते. दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी होती. श्रद्धाळूनी हर हर महादेव आणि जय बाबीरदेवच्या जयघोषात भक्तिभावाने दर्शन घेतले. संपूर्ण धनगरवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष मच्छिंद्र आडभाई, उपाध्यक्षा आशा आडभाई, रामचंद्र राशिनकर, अनिता राशिनकर, हभप देवीदास आडभाई, हभप शिवासहाय पंडित, रामसाहेब तांबे, सूर्यकांत वीरकर, प्रकाश तांबे, ज्ञानेश्वर केतके, चांगदेव गायकवाड, बाबासाहेब तांबे, शिवाजी वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

