नेवासा-नगरोत्थान महाभियान अंतर्गत नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटी ४२ लाख रुपयांची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्याच्या अटीच्या अधिन सदर प्रकल्पास तत्वतः प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार नगर विकास विभागाने यास तत्वतः मान्यता व मंजुरी दिली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

