नेवासा – शनिशिंगणापूर येथील हंगामी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळीही पगाराविना गेली असल्याने अशा संतप्त ५७० कर्मचाऱ्यांनी या थकीत वेतनासाठी उद्या दि ५ नोव्हेंबर पासून शनिशिंगणापुरला उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
जुन्या ३२७ कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळी अगोदर झाले आहे परंतु त्यांनाही बोनस मिळाला नाही व जे ५७० कर्मचारी कामावर आहे त्यांचा पगार समितीने केला नाही. वास्तविक ६ महिने एखाद्या संस्थेचे वेतन घेतल्यास त्यांना कायम केले जाते अशी चर्चा त्या कर्मचाऱ्यांत आहे. ५७० कर्मचारी वगळता दुसरे ५७ कर्मचारी कोर्टात गेले आहे त्यांनाही वेतन मिळाले नाही. शिंगणापूर देवस्थानला नेहमीच राजकीय झालर राहिली आहे आताही नवीन समिती व जुने विश्वस्त मंडळ यांचा वाद न्यायालयात आहे. या सगळ्या गोष्टीचा फटका गोरगरीब कर्मचाऱ्यांना बसत आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आम्हीं शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे कर्मचारी असून गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नाही अनेकदा लेखी, तोंडी विनंत्याही केल्या होत्या. असे. निवेदन या. कर्मचाऱ्यांनी देवस्थानचे कार्यकारी समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना दिले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना वेतनाची समस्या निर्माण झाली आहे. देवस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीला वेतन करण्यात आले होते. त्यांनीही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांना दिवाळीला वेतन देण्यात आले होते. आता हंगामी कर्मचारी वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन अदा न झाल्याने कर्मचारी वर्ग संताप व्यक्त करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

