नेवासा – होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश मुंबई येथे आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
हा प्रवेश होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर झाला असून तालुक्यामध्ये राष्ट्रवादी मजबूत ठेवण्याचे काम अब्दुल शेख यांनी आतापर्यंत केले त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचे काम माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे करणार आहेत तसेच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे आता पहावयास मिळणार आहे.

एका बाजूला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरावजी गडाख एका बाजूला शिवसेना शिंदे गटाची विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे तसेच एका बाजूला आता नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार मध्ये सामील झालेले बाळासाहेब मुरकुटे यामुळे आता तालुक्यामध्ये नवीनच राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहेत तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच गटामध्ये चांगला जोर लावणार असल्याचे बोलले जात आहे.
बाळासाहेब मुरकुटे यापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये गेल्या विधानसभेच्या कालखंडामध्ये प्रवेश करून प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभेची निवडणूकीला सामोरे गेले होते परंतु त्यांना त्यामध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत आता त्यांनी थेट सत्तेमध्ये असलेल्या अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुंबई येथे आज जाहीर प्रवेश केलाय तरीही नेवासा तालुक्यातील या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अब्दुल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेवासा तालुक्यामध्ये टिकून ठेवला होता आता त्यांना बाळासाहेब मुरकुटे यांच्या रूपाने मोठी ताकद मिळाली आहे तरी बाळासाहेब मुरकुटे चा हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कितपत यशस्वी ठरतोय हा येणारा काळच ठरवेल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

