मुळा पाटबंधारे विभागाने राहुरी तालुक्यातील पिंपरी – खेडले शिवरस्ता अडवल्यामुळे अनेक आदिवासी व दलितांच्या जमिनी पड काला ,विद्यार्थ्यांचा जीव घेणे प्रवास .
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की पिंपरी खेडले शिव रस्त्यावरून अनेक शेतकरी आपल्या शेतीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत होते .परंतु डी वाय तीन चारीवर यापूर्वी चारीची खोली कमी असल्यामुळे चारीतून वाहतूक केली जायची हा रस्ता चारीचे खोदकाम खोल झाल्यामुळे बंद झाला व अक्षरशः शेतकऱ्यांना शेताकडे जाणे मुश्किल झाले व परिणामतः शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडल्या आहेत .
या सर्व बाबीला मुळा पाटबंधारे विभागाच्या अभियंत्या जबाबदार आहेत .
याचे कारण असे की जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चारीवर पूल बांधण्यासंबंधीचे निर्देश देऊन सुद्धा जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशाला पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी केराची टोपली दाखवली .

त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ संतप्त झालेले असून लवकरच उपोषणाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती उपसरपंच जालिंदर कानडे,राधेश्याम जाधव , शिवाजी सखाराम जाधव,भाऊराव बर्डे,शिवाजी राजाळे,संभाजी शिंदे,किशोर नांगरे ,,फक्कड जाधव,नवनाथ डमाळे,राजू भाई शेख, राजु बनकर , आकाश बनकर , बाबासो कानाडे, गोविंद कानडे, आदि नी दिला आहे.
या रस्त्यालगत अनेक दलित व आदिवासी वस्ती वास्तव्यस आहे त्यांना रस्ता नसल्याकारणाने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे .
एकीकडे शासन शिवरस्ते मोकळे करण्याचे सांगत आहे तर दुसरीकडे मुळा पाटबंधारे विभाग रस्ता बंद करीत आहे त्यामुळे शासनाच्या या धोरणाचे नेमके कारण काय?असा प्रश्न आता नागरिकांपुढे पडला आहे.
मुळा पाटबंधारे विभागाच्या या अडमुठ्या धोरणामुळे शेतकरी अक्षरशा मेटाकोटीस आले आहेत . जलसंपदा व पालकमंत्री ज्या जिल्ह्याचे आहे त्या जिल्ह्यातच मुळा पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंते जनतेस वेठीस धरीत आहे तरी जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित गोष्टीकडे लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

