नेवासा : पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात अंकुश महाराज जगताप यांच्या पाच दिवशीय संगीतमय हनुमान कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. ८) रात्री काल्याची दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त देवीदास महाराज म्हस्के, आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, सचिन देसरडा, भास्करराव कणगरे, विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, मनोज पारखे, किशोर गारुळे, निरंजन डहाळे, कृष्णा डहाळे, अमृता नळकांडे उपस्थित होते.

संगीतमय हनुमान कथा सोहळ्यात संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त अंकुश महाराज जगताप यांनी कथेद्वारे भाविकांना मंत्रमुग्ध केले. अंकुश महाराज जगताप यांनी काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला सांगून काल्याचे महत्व विषद केले. महंत देवीदास महाराज म्हस्के, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी कथेचे सुंदर नियोजन केल्याबद्दल पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पारखे यांचा सन्मान केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

