पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसे खुर्द, शिंदेमळा, जाधववाडी, पवारवाडी यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग ( मॅजिक शो )चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच प्रविण उदमले,सोसायटीचे मा.चेअरमन सुभाष शिंदे, कृषीगंगा पाणी वाटप संस्थेचे संचालक बजरंग मदगे उद्योजक सुभाष बढे उद्योजक किशोर शिंदे, सोमनाथ बढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल मदगे अहिल्यानगर प्राथ. शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर,चित्रपट गीतकार अरुण वाळुंज,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गायकवाड, राजू कारखिले या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले सोसायटीचे मा.चेअरमन सुभाष शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. म्हसे खुर्दचे सरपंच प्रविण उदमले यांनी अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाणारे असे उपक्रम शाळेत राबविणे आवश्यक असल्याचे मनोगतातून सांगितले .

जादूगार श्री. प्रकाश शिरोळे यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करून हातचलाखी विज्ञान या बाबी समजावून सांगितल्या सादर केलेल्या जादूच्या प्रयोगाने, हास्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, टाळ्या वाजवत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे संयोजक चित्रपट गीतकार श्री. अरुण वाळुंज यांनी जादूचे प्रयोग हा मनोरंजनातून शिक्षणाकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे मत व्यक्त करत प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारभारी बाबर केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या सर्व शाळा भविष्यात अधिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेईल असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

गटशिक्षणाधिकारी के. आर. ढवळे, विस्तारअधिकारी देवराम पिंपरकर, केंद्रप्रमुख नारायण बाचकर यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक कैलास काळे,अंबरनाथ शिंदे, इंद्रभान ठाणगे, संजय गायकवाड,पुष्पा काळे मॅडम, रश्मी पायमोडे, पालक,अंगणवाडी सेविका,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.मुख्याध्यापक कैलास काळे यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

