निवडणुक

नेवासा – नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवार (दि. १०) पासून उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात झाली झाली. दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासनाने १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांसह विविध पथकांसाठी त्यांना जबाबदारी ठरवून दिली आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना, उमेदवारासह केवळ तीन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संजय बिराजदार व मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी दिली.

नेवासा नगरपंचायतीची २ डिसेंबरला निवडणूक होत आहे. त्यानिमित्ताने निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुधीर पाटील यांनी सांगितले की, १७ प्रभागांमधील २, ४, ७, ९, १४ या मतदानाची गैरसोय होऊ नये, म्हणून वाढीव यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. शपथ पत्र साध्या कागदावर चालणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना ११ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

निवडणुक

शपथपत्र, मतदारयादीतील क्रमांकाची प्रत, बँक पासबुक छायाप्रत, अनामत रकमेची पावती, घोषणापत्र, अपत्याबाबत स्वयंघोषणा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे नोटरीकृत प्रमाणपत्र, राखीव जागेसाठी जातवैधता प्रमाणपत्र, निवडणूक खर्चाबाबत हमीपत्र व नगरपंचायतीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र यांचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करताना केवळ प्रतिनिधी व सूचक यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

पक्षाच्या उमेदवाराला एक, तर अमान्यताप्राप्त पक्ष किंवा अपक्ष

उमेदवाराला पाच सूचक आवश्यक आहेत. सूचक संबंधित प्रभागातील मतदार असणे आवश्यक आहे. एक सूचक एकाच उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करू शकतो; अन्यथा पहिला अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.

निवडणुक

शहरातील एकूण ७ मतदान केंद्रांसाठी ५ क्षेत्रीय अधिकारी नेमले आहेत. १७ प्रभागांत २२ बूथ केले आहेत. सर्वसाधारण उमेदवारास १ हजार, तर राखीव उमेदवारास ५०० रुपये अनामत रक्कम आहे. १८ हजार ७१२ मतदार संख्या आहे. नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापला आहे. नव्याने मारुतीनगरला मतदान केंद्र करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी पाटील यांनी दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३पर्यंतच स्वीकारले जाणार आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निवडणुक
निवडणुक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निवडणुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *