एसटी

प्रवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा, घोडेगाव ते नेवासा प्रवास होतोय दीड तासांचा

गणेशवाडी – नगर- संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील वडाळा नजीक अनधिकृत ढाब्यांवर एसटी महामंडळाचे बसथांबे पुन्हा एकदा डोकेदुखी ठरु लागले आहेत. प्रवाशांच्या वेळ व पैसा खर्च करणारे हे थांबे तत्काळ बंद करावेत, अशी मागणी आता प्रवासी वर्गातून जोर धरु लागली आहे. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा सोनई आणि नेवासा परिसरातील प्रवाशांनी दिला आहे.
नगर- संभाजीनगर महामार्गावरील वडाळा व घोडेगावच्या लगत असणाऱ्या हाँटेल धनश्री आणि हाँटेल शितल येथे महामंडळाच्या बसेस थांबतात. या दोन्हीही हाँटेलला अधिकृत परवाना नसल्याचं समोर आलंय. याबाबत काही प्रवाशांनी एसटीच्या तारकपूर डेपोतही तक्रारी केल्याचं समजतं. परंतु हे दोन्ही हाँटेलला परवानगीच नाही, असं समजल्यावर प्रवाशांचा पारा चढलाय. या हाँटेलचे मालक एसटीच्या चालक वाहकांना काही रोख रक्कम देऊन लुभावत असल्याचं वास्तव समोर आलंय. काही प्रवाशांनी या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचेही सांगितले जातेय.

एसटी


घोडेगाव ते नेवासा फाटा या फक्त 20 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना या हाँटेवर तब्बल तासभर थांबावे लागते. प्रवासादरम्यान रस्त्यांवरील ढाब्यांवर चहापानासाठी एसटी बस थांबवल्या जातात. या ढाब्यांवर बस थांबल्यानंतर किमान अर्धा ते पाऊण तास वेळ वाया जातो. नगर ते पुणे आणि पुणे ते नगर या प्रवासातही बसेस ढाब्यावर थांबवल्या जात असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जातो. नगर ते संभाजीनगर या दोन तासांच्या अंतरात बस हॉटेलवर थांबवण्याची गरज नसल्याचे प्रवाशांनी विभाग नियंत्रक कार्यालयास यापूर्वीही कळवले होते. तसेच, या प्रकारांबाबत तक्रारीही केल्या होत्या. प्रवाशांच्या या तक्रारींची दखल घेण्यात येऊन या मार्गावरील सर्व थांबे रद्द करण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी 2017 साली घेतला होता. नगर-पुणे मार्गावरील सर्व थांबे एसटीने रद्द केले असल्याने एसटीच्या दृष्टीने हे ढाबे आता अनधिकृत झाले होते. त्यामुळे या ढाब्यांवर पुन्हा बस थांबल्यास याबाबत ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन कार्यालयाने केले आहे. dtoahmadnagar@gmail.com या वेबसाइटवर प्रवाशांनी तक्रार करावी, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी त्यावेळी केले होते.
त्यानंतर आता पुन्हा या मार्गावरील बसेसे धनश्री व शितल या अनधिकृत थांब्यावर थांबतात. एसटीने दिलेल्या पोर्टवर अनेकदा तक्रारी करुनही काहीच उपयोग होत नसल्याने प्रवाशांत आता संतापाची लाट उसळली आहे. हे थांबे तत्काऴ बंद न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

एसटी

या थांब्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे दरही जादा असून प्रवाशांना नाईलाजाने हॉटेल मालक सांगेल तेवढ्या किमतीला हा खाद्यपदार्थ द्यावा लागतो इतर ठिकाणी वडापाव चे वीस रुपयाचे घर असताना या ठिकाणी तीस रुपये घेतले जात असल्याचे प्रवाशाकडून समजते वारंवार मागणी करूनही एसटी महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता प्रवाशांचा अंत पाहू नये केवळ आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे प्रवाशाचे म्हणने आहे.

एसटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *