टाकळीभान – हरियाणा येथे होणाऱ्या शालेय १९ वर्षा खालील वयोगटातील महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ओन्ली साई क्रीडा मंडळ, टाकळीभानचा खळाडू शिवम कैलास गोर्डे याची निवड झाली आहे.
वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये ओन्ली साई क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दृतीय क्रमांक पटकाऊन सिल्वर मेडल मिळविले.

अहिल्यानगर जिल्ह्याचे संघातील खेळाडू यांनी पुणे विभाग मधून उत्कृष्ट खेळ केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील सागर एडके,
सुमित देसाई तसेच ओन्ली साई क्रीडा मंडळ टाकळी भान मधील शिवम कैलास गोर्डे यांची व साद कागदी याची रिझर्व्ह खेळाडू म्हणून हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्याच्या या यशामागे ओन्ली साई क्रीडा मंडळाचा मोलाचा वाटा आहे त्याची राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिव छत्रपती पुरस्कार विजेते अस्लम इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते निलेश साळुंखे तसेच राष्ट्रीय खेळाडू आत्माराम कदम यांनी काम पाहिले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

