आरोपी

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर पथकाची कारवाई, धरपकड सञ सुरु.

नेवासा – दिनांक 29/11/2025 रोजी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर येथे मा.श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहीती मिळाली की, दोन ईसम नामे साहिल शकिल पिंजारी रा. मोरगेवस्ती वार्ड नं.07 श्रीरामपुर जि. अहिल्यानगर हा त्याचा साथीदार हे नॉर्दन ब्रेन्च चौक ते डावखर चौक जाणा-या रोडवर टावर चौक परीसर वार्ड नं. 07 मोरगेवस्ती श्रीरामपुर येथे गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आला आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाली असता मा.अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे श्रीरामपुर यांनी लागलीच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांची मदत घेवुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.

आरोपी

वरील पथकाने खाजगी वाहनाने पंचासह सदर ठीकाणी जावुन खात्री केली असता, त्या ठीकाणी दोन इसम हे संशयीतरीत्या फिरताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन पोलीस असल्याची ओळख पटवुन देवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) साहिल शकिल पिंजारी वय 23 वर्षे रा मोरगेवस्ती वार्ड नं 07 ता श्रीरामपुर जि. अहिल्यानगर 2) एक विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजले त्यांस त्यांच्या अंगझडतीचा उद्देश समजावुन सांगुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टाल व एक जिवंत काडतुस मिळुन आले त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, सदर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे सांगितले. तसा सविस्तर पंचनामा करुन ते जप्त करण्यात आले. त्याबाबत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गुं.र.नं. 1054/2025 भारतीय शस्ञ अधिनियम कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्र सुधारणा अधिनियम 2019 चे कलम 09 नुसार कोणत्याही अल्पवयीन बालकास अग्निशस्ञ विकणे, त्याच्या ताब्यात देणे आदि बाबींसाठी गंभीर शिक्षा नमुद केली आहे. सदर अधिनियमाच्या कलम 25 (8), 29 नुसार सदरच्या अपराधास जन्मठेप पर्यत शिक्षा आहे. सदर बाबत सविस्तर तपास करुन वाढीव कलम लावण्यात येत आहे.

आरोपी

सदर गुन्ह्यातील आरोपी याने सदरचे अग्निशस्त्र हे कोणाकडुन आणले होते ? तसेच कोणास विक्री करणार होते ? अगर कोणता उद्देश होता? याबाबत तपास करत सुरु आहे

सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख, सपोनि गणेश जाधव व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोसई चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, मोबाईल सेलचे पो.हे.काँ सचिन धनाड, पो.ना रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो.कॉ रविद्र अभंग यांनी केली आहे.

newasa news online
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!