भानसहिवरे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना इसाक शहा मिञमंडळाच्यावतीने अभिवादन!
नेवासे (प्रतिनिधी) – ज्ञानसूर्य,महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानाच्या अथांग सागरास भानसहिवरे (ता.नेवासे) येथे शविवार (दि.६) रोजी इसाकभाई शहा मिञमंडळाच्यावतीने विनम्र अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण,संघटन,संघर्ष यातून गगनभेदी ज्ञानाच्या सहायाने शोषित,पीडित,हाजरो वर्षे गुलामगिरीच्या व अस्पृश्यतेच्या खाईत लोटल्या गेलेल्या पीडितांना ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही’ हे ज्वालामुखी विचार हे आजच्या अन्यायावर मात करणारे असून या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्यक्षात समाचात आत्मसात करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीचे माजी सभापती किशोर जोजार यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासे पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार,इसाकभाई शहा,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रविण वंजारे, ओबीसी नेते संदिबबाबा क्षिरसागर,योसेफ मिरपगार, आंद्रेस मकासरे,राजू मकासरे,जय साळवे, बिट्टू वंजारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जोजार पुढे म्हणाले की,ज्ञानाच्या महासागर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपल्या देशाचा कारभार चालत असून महामानवानी सर्वसमाजाला न्याय दिलेला असून त्यांचे ज्वलंत विचार समाजाने आत्मसात केल्यास निश्चितच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून ते म्हणाले की, महामानवाच्या विचाराने आता प्रत्येक युवकांनी प्रेरीत होवून काम केल्यास भविष्यकाळ उज्वल होण्यास वेळ लागणार नाही असेही यावेळी ते म्हणाले, इसाक शहा मिञमंडळाच्यावतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करुन महामानवास अभिवादन करण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक,राजकीय व धार्मिक क्षेञातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

