सातबारा कोरा करण्याच्या राज्यव्यापी मोहिमेच्या औचित्याने शिरसगाव येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी शेतकरी संघटनेतर्फे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मेळाव्यात बोलताना एडवोकेट अजित काळे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या सातबारा कोरा मोहिमेद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक भागात जाऊन आम्ही शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत आहोत. शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, यासाठी संघटना कटिबद्ध आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांवरील आत्महत्येच्या कलंकास जबाबदार धोरणांवर टीका करताना म्हटले की, महाराष्ट्रातील आत्महत्यांचा कलंक पुसून काढण्यासाठी हा संघर्ष आहे. तसेच आपल्या भाषणात त्यांनी साखर कारखानदारीतील भ्रष्टाचारावर सडकून टीकास्त्र सोडले.

शेतकरी संघटनेचे बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण वडले यांनी कारखानदारांकडून होत असलेल्या शेतकरी लुटीवर कठोर शब्दांत टीका करताना सांगितले की, प्रत्येक टन ऊसामागे तीन किलो रिकव्हरी कारखानदार चोरत आहेत. उत्पादन खर्चातही घोळ केला जात आहे. शेतकऱ्याच्या ऊसाला किमान साडेसात हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे.
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी रघुनाथ दादा पाटील होते. कार्यक्रमास डॉक्टर कुलकर्णी, एडवोकेट अजित काळे, लक्ष्मण वडले, युवराज पाटील, अरुण गोरे, भास्कर तुवर, बाबासाहेब खराडे, शिंदे सर, मुमताज भाई, डॉ. कोकणे, भाऊसाहेब तराळ, विश्वास मते, महेश ढोकणे, सुधाकर देशमुख, सोमनाथ औटी, अशोक ढगे, पुरुषोत्तम सर्जे, ज्ञानेश्वर शिरसाट, बाळासाहेब कावळे, दत्तात्रय निकम, दादासाहेब नाबदे, युवराज जगताप, बाबासाहेब नागवडे यांसह अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात मदन खंडागळे व अरुण गोरे यांनी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश करून संघटनेची ताकद अधिक वाढवली.
सातबारा कोरा मोहिमेला गती देत, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शिरसगावातील हा मेळावा उत्स्फूर्त वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

