नेवासा – २२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या नेवासा येथील जनकल्याण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप सचिन महाराज पवार,उदयकुमार बल्लाळ नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील व सर्व प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पतसंस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा ही सन्मान करण्यात आला.
नेवासा येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिराच्या प्रांगणात नववर्षाच्या पूर्व संध्येला झालेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शनैश्वर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ हे होते तर पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र महाजन,चेअरमन महेश मापारी,व्हाईस चेअरमन अभयकुमार गुगळे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात पतसंस्थेचे चेअरमन महेश मापारी यांनी पतसंस्थेच्या प्रगतीच्या आढावा घेतला.गावाच्या विकासासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी एकोप्याने व पक्षविरहीत काम करावे यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित अतिथींसह नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले व नगरसेवकांचा संचालक व ठेवीदार सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी
कल्पकता ही जनकल्याण पतसंस्थेची दुसरी बाजू असून
सामाजिक बांधीलकी जपत कार्य केले आहे असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले नेवासा शहराचा हरवलेला विकास परत आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन शहराच्या उत्कर्षासाठी काम करू ग्वाही यावेळी बोलतांना दिली.
यावेळी झालेल्या प्रकाशन सोहळयाच्या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक सतीश मुळे सर,उद्योजक भारत कर्डक,माजी सरपंच सतीश गायके, अँड.सादिक शिलेदार,नगरसेवक अँड.संजय सुखदान, क्रांतिकारीचे गट नेते जितेंद्र कु-हे, भाजपा शिवसेना महायुती प्रणित शहर विकास आघाडीचे गटनेते महेश लोखंडे,नगरसेवक प्रविण सरोदे,डॉ.राहुल चव्हाण,संभाजी धोत्रे,कृष्णा परदेशी,

अनिल शिंदे,संदीप सरकाळे, नगरसेविका सौ.शीतल डहाळे,जालिंदर गवळी, स्वप्नील मापारी,मुक्तार शेख,अँड.फरदिन पठाण,गणेश व्यवहारे,अनिल पवार,पतसंस्थेचे संचालक माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे,गुरुप्रसाद देशपांडे,शशिकांत नळकांडे,अभयकुमार मुथ्था,प्रविण चक्रनारायण,दत्तात्रय तागड,किरण घोडेकर,वैभव नहार , सौ.स्वाती मापारी,सौ.अश्विनी मापारी,रशीदखान पठाण, पतसंस्था व्यवस्थापक सचिन गव्हाणे,कलेक्शन प्रतिनिधी संदीप आलवणे,रमेश शिंदे यांच्यासह ठेवीदार खातेदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

