अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयात मंगळवार दिनांक-६ जानेवारी २०२५ रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यालयाचे माजी विद्यार्थी,नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष डॉ. शंकर शिंदे, खजिनदार सुधीर बोरकर, सचिव रावसाहेब चौधरी यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनेश व्यवहारे, ॲड. बापूसाहेब गायके, अभयजी मुथ्था, डॉ. श्रवण एरंडे, स्वप्निल मापारी, वैभव वाकचौरे, संतोष घोरपडे, आप्पासाहेब बेंद्रे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे, शिक्षिका अनिता लोखंडे, शिक्षक संजय मतकर, अनिल भणगे, शिरीष राऊत उपस्थित होते. शिक्षक काकासाहेब काळे व संजय आखाडे यांनी संयोजन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

