भेंडा | नामदेव शिंदे – आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण भेंडा बुद्रुक या शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल आनंद मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाद्यपदार्थ कला व कार्यानुभव वस्तू तयार करून बाल आनंद मेळाव्यात सुबक पद्धतीने मांडणी केली होती.
विद्यार्थ्यांचे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान कौशल्य अजमावण्यासाठी व खरेदी करण्यासाठी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी शालेय परिसरात गर्दी केली होती.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय भाऊ काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प गोरे महाराज हे होते.

शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक – रामभाऊ गवळी यांनी केले.
कार्यक्रमासाठी ह.भ.प.गोरे महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ काळे, डॉ.रामराव आढाव, नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष – शिवाजीराव तागड, नामदेव शिंदे, किशोर मिसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – संदीप गव्हाणे, कृष्णभाऊ गव्हाणे, सतीश शिंदे, संतोष गव्हाणे, अरुण निकम ,अशोक गव्हाणे, छबन शिंदे, विष्णू फुलारी, सोमनाथ गोंडे ,सोन्याबापू गायकवाड, भाऊसाहेब फुलारी, पीएम श्री. शाळेचे मुख्याध्यापक – संजय कडूस, कानिफनाथ दौंड, दत्तात्रय नवगिरे, संजय वाघ, अंगणवाडी सेविका – आशाताई कादे, मिना मडके , सरिता निकम, उज्वला गव्हाणे, ज्योती गव्हाणे, ज्ञानेश्वरी कादे, संगीता गोर्डे, सखुबाई आढागळे आदींसह महिला भगिनी तसेच तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्याला शिक्षिका श्रीमती हिराबाई पोंदे, ताई गायकवाड, चांगुना हंडाळ, रेखा फंड, संगीता नळे, शितल कदम, ताराचंद कोकाटे , हरिश्चंद्र ठोंबरे आदी शिक्षकांनी भेट दिली. विद्यार्थ्यांकडून खरेदी करून विद्यार्थ्यांना आनंद दिला.
कार्यक्रमयशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ गवळी व श्रीमती विमल देवकर यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य आदींनी सहकार्य केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

