वारकरी आणि भाविकांच्या गर्दीतूनच डंपर-ट्रॅक्टरची बेदरकार धाव; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
नेवासा | नाना पवार – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेली नेवासा नगरी सध्या वाळू तस्करांच्या विळख्यात सापडली आहे. मंदिर मार्ग सध्या भाविक व वारकऱ्यांसाठी सुरक्षित न राहता जीवघेणा ठरत असल्याचे विदारक चित्र आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीतूनच वाळूची अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने, “भक्तीच्या मार्गावर मृत्यू धावतोय की काय?” अशी भीती नेवासकरांमधून व्यक्त होत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दर्शनासाठी येणारे भाविक, दिंड्या, स्थानिक महिला व मुलांची सतत वर्दळ असते. वारकरी भजन करत जात असतानाच अचानक समोरून किंवा मागून वाळूने ओसंडून वाहणारे डंपर व ट्रॅक्टर बेदरकारपणे येतात. या वाहनांच्या वेगामुळे वारकऱ्यांची मोठी तारांबळ उडते.या कोणत्याही वाहनांला नंबर प्लेट नाहीत, तर चालकांचे वाहनांवरील नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

या मार्गावर वेगमर्यादा किंवा वेळेचे कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत. रात्रीच्या वेळी तर ही समस्या अधिकच गंभीर बनते. जर या ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारणार का? असा संतप्त सवाल भाविक विचारत आहेत. पोलीस आणि महसूल विभागाने केवळ रस्त्यावर कागदी कारवाई करण्यापेक्षा प्रत्यक्ष भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावर अवजड वाहनांना बंदी का घातली नाही, याचे उत्तर आता मिळणे गरजेचे आहे
आम्ही श्रद्धेने मंदिरात येतो, पण या वाळूच्या वाहनांमुळे जीव मुठीत धरून चालावे लागते. प्रशासन एखाद्या मोठ्या बलिदानाची वाट पाहत आहे का?” असा खडा सवाल आता भाविकातून उपस्थित केला जात आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

