
नेवासा : तालुक्यातील खडका परिसरात दोन दिवस सलग बिबट्याच्या दर्शनाने येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. एका ऊसतोडणी कामगारांवर हल्ला केल्याची चर्चा होत आहे. शेतकरी व – मजूर शेतात जाण्यास – धजावत नाही. येथील रहिवाशांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.गेल्या काही – दिवसांपासून खडका रस्त्यावरील नागझिरी परिसरात काही दिवसांपासून बिबट्या असून, या बिबट्याने गुरुवारी (दि. ८) सायं. ७च्या दरम्यान ऊसतोडणी कामगारांवर हल्ला केल्याची चर्चा आहे. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या वस्तीजवळील पाणंद येथे
हा प्रकार रस्त्यावर झाल्याचे नागरिक सांगतात.

काही पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वा. काही तरुण चारचाकी वाहनातून खडका रस्त्याने महामार्गाकडे जात असताना त्यांना हा बिबट्या घाडगे ओढ्याच्या पुलावर बसलेला दिसला. तातडीने गाडीच्या उजेड बिबट्याच्या अंगावर पडल्याबरोबरच त्याने ओढ्याच्या उत्तर दिशेला झेप घेतली. या तरुणांनी परिसरातील मित्रांना बिबट्याची
कल्पना दिली. त्यामुळे नागझिरी भागातील मुरकुटे, महानोर, भागवत, चव्हाण, शिंदे, गवळी आदी वस्त्यांवरील शेतकऱ्यांनी शुक्रवारची रात्र जागून काढली. अनेकांनी गहू, ऊस आदी पिकांना पाणी देण्याचे टाळले. शेतकऱ्यांनी बिबट्याच्या भीतीने फटाके फोडले.

या परिसरामध्ये किती बिबट्या आहेत? याचा अंदाज येत नसल्याने शेतातील कामे करण्यास मजूर धजावत नाही. सध्या कांदा व ऊस लागवड कामे सुरू असल्याने बिबट्याच्या भीतीने शेतमजूर शेतीकामासाठी येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

