नेवासा : नेवासा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी गुरूप्रसाद देशपांडे यांची सार्वनुमते निवड करण्यात आली आहे.
प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार अशोकराव डहाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.१२) रोजी झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.
या बैठकीत पत्रकारांसाठी विविध उपक्रम विषयी चर्चा, विविध विषयांवरील पत्रकार परिषदांचे आयोजन आणि पत्रकार परिषदांसाठीचे नियोजन,शहरातील पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्न, गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबीत असलेल्या पत्रकार भवन व वसाहतीचा प्रश्न या बाबत चर्चा करण्यात आली.

कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी स्वागत केले. तर दैनिक सकाळचे प्रतिनिधी व मावळते अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक करून संघाच्या कामकाजाची माहिती सांगितली.
यावेळी प्रेसक्लब कार्यकारणी पुढील प्रमाणे- उपाध्यक्षपदी कैलास शिंदे(पुढारी) व अशोक डहाळे(सामना),
सचिवपदी लोकमतचे सुहास पठाडे,सहसचिवपदी मकरंद देशपांडे (सार्वमत),खजिनदारपदी मोहन गायकवाड( सकाळ)
कार्याध्यक्षपदी सुधीर चव्हाण(राष्ट्र सह ),संघटकपदी पवन गरुड व रमेश शिंदे(सार्वमत ) यांची निवड करण्यात आली. .
मावळते अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी मागील कालावधीतील उपक्रमातील माहिती दिली. तसेच यावेळी त्यांचा मागील वर्षातील चांगल्या कामकाजाबद्दल प्रेस क्लबच्या वतीने अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. या बैठकीस शंकर नाबदे,नानासाहेब पवार,शाम मापारी,अभिषेक गाडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

