षट्तिला एकादशीनिमित्त तालुक्यातील शेकडो दिंड्यांचा गजर
नेवासा : षट्तिला एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामअसा गजर करत हजेरी लावली होती. आलेल्या दिंडयांचे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांनी स्वागत केले.
पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज
मंदिराचे प्रमुख देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभर माऊलींच्या प्रांगणात रांगोळी काढणाऱ्या सुरेखा वाघ व अभिजित वाघ या यजमानांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात
आला. यावेळी झालेल्या पहाटेच्या पूजेप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

षट्तिला एकादशीला द्रवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी स्वागत केले. यावेळी खेड्यापाडयांतून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे म्हस्के महाराज म्हस्के, विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल
रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली पैस खांब, भगवान दत्तात्रय, करविरेश्वर, वै. बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दनि गजबजून गेला होता. मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते.
रात्री देवीदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

