रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
नेवासा- शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात नेवासा तालुका रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. परवाना नसलेली वाहने खुलेआम प्रवासी वाहतूक करत असल्यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांवर अन्याय होत असून, त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप संघटनेने केला होता.
या आंदोलनाची दखल घेत संबंधित पोलीस स्टेशनचे पाटीलसाहेब यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याचे तसेच नियमित तपास मोहीम राबविण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे सुरू असलेले आमरण उपोषण सध्या तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत वालतुरे, सचिव योगेश काळे, उपाध्यक्ष गंगाराम नवसे, विद्यमान नगरसेवक अकुश म्हस्के . तसेच माजी अध्यक्ष श्रीपतराव दांरुटे, माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन नागपुरे,नगरसेवक अनिल पवार, बाळासाहेब निकम, श्रीनिवास डहाळे, गंगाराम दगडे, भाऊसाहेब डाके, रमेश गायकवाड, किरण डाके, दिनेश सरगेये, संजय पोकळे, कुंडलिक लष्करे निलेश दारुंटे, प्रमोद काळे, मोहन जाधव, सचिन मस्के, आरिफ पठाण ,दिनेश लष्करे, युसुफ इनामदार, सोमा गोरे, मुन्ना पठाण ,कैलास धारकर, सलमान शेख ,सतीश बोर्डे, संदीप घोरपडे, इकबाल सय्यद अमन मंसूरी यांच्यासह अनेक रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास तसेच अवैध प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू राहिल्यास भविष्यात पुन्हा आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता प्रत्यक्ष कारवाई करून परवानधारक रिक्षाचालकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

