नेवासा-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर
२१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार / परीक्षार्थीना लॉगिन करुन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे
अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन अर्ज करावा लागेल; यासाठी नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक आहे, आणि वैध कारणांशिवाय केलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे.’

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

