नेवासे (प्रतिनिधी) – आईच्या मायेची आणि तिच्या अमूल्य मार्गदर्शनाची आठवण ठेवत तिच्या प्रेरणेने आपण समाजासाठी काही तरी कार्य केले पाहिजे आईच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून मुलाने समाजासाठी काहीतरी चांगल्या कर्माने मोठे होण्याचा संदेश देत वृद्धाश्रमातल्या गरजू लोकांना मदत म्हणून आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरानिमित्त अन्नदान आणि वृद्धाश्रमातल्या गरजूसाठी एक खोली बांधून देण्याचा संकल्प करत त्यासाठी रोख पन्नास हजार मदत करून आईच्या आठवणींना चिरंतन करण्याचा एक भावनिक प्रयत्न नेवासा तालुका शिवसेना उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण यांनी केला आहे.

माणूस हा केवळ संपत्तीने नाही तर कर्माने मोठा होतो,या आईच्या शिकवणीनुसार कार्य केले पाहिजे,जे समाजातल्या इतरांसाठी आदर्श ठरेल अशा प्रकारे,आईच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पारंपरिक विधींसोबतच सामाजिक मदतीचा मार्ग त्यांनी निवडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे मुन्ना चक्रनारायण त्यांच्या मातोश्री मंगलबाई सुधाकर चक्रनारायण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शरणपूर वृद्धाश्रमात नुकतेच त्यांनी प्रीती भोजन देत वृद्धासाठी एक खोली बांधून देण्यासासाठी त्यांनी मदत म्हणून पन्नास हजार रुपये रोख स्वरूपात दिले.
यावेळी बिट्टूभाऊ लष्करे,अशोक उपळकर,इसाकभाई शहा,नारायण लष्करे,जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे,
ज्ञानेश्वर गोशाळा संस्थापक अध्यक्ष सोमनाथ बोरुडे,हरीश चक्रनारायण,प्रकाश चक्रनारायण,अविनाश चक्रनारायण, योसेफ चक्रनारायण,दिलीप साळवे,रवींद्र पवार,राजेंद्र बोलके,उत्तम इंगळे,सचिन नेमाने,इंजिनीरिंगयर आदित्य चक्रनारायण,आदित्य तोडमल,तोफिक पठाण,सम्राट कांबळे,देवा चक्रनारायण आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

