हास्य,मैत्री आणि आयुष्याची ‘पलटी’ दाखवणारा मराठी चित्रपट “पलटी फायर”
नेवासे – आजच्या धावपळीच्या युगात आयुष्यात माणसाला काही क्षण तरी मनापासून हसवणारा सिनेमा फार गरजेचा आहे अशीच हसत-खेळत आयुष्याची गंमत दाखवणारी कथा घेऊन एक मराठी चित्रपट “पलटी फायर” प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.
या चित्रपटातील कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या असून भेंडा (ता. नेवासे) येथील दिग्दर्शक राहुल वडकर यांनी वास्तववादी मांडणीवर या चित्रपटात भर दिलेला आहे आकर्षक सिनेमॅटोग्राफी, दमदार पार्श्वसंगीत आणि थरारक प्रसंग ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये आहेत.

राहुल वडकर दिग्दर्शित या चित्रपटात साध्या तरुणांची स्वप्नं,त्यांची मैत्री,छोट्या-मोठ्या गमतीजमती आणि आयुष्यात अचानक येणाऱ्या ‘पलटी’ यांचे खुमासदार चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे विनोदाच्या माध्यमातून जीवनातील वास्तव मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात आलेला आहे.
या चित्रपटात लखन वाडकर,विवेक मोरे,अर्जुन गोंडे, रोहन साळवे,सोहेल सय्यद,राहुल वाडकर,आर्यन गोर्डे, कृष्णा गोंडे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

“पलटी फायर” हा केवळ कॉमेडी सिनेमा नसून,तो प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कधी हसवणारे,कधी विचार करायला लावणारे प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत मित्रांमधील निरागस नाती,छोट्या चुका आणि त्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग प्रेक्षकांचे मन जिंकणार असल्याचे यावेळी वाडकर यांनी बोलतांना सांगितले.
या चित्रपटातील कलाकारांनी आपापल्या भूमिका अत्यंत नैसर्गिक पद्धतीने साकारल्या असून संवादांमध्ये असलेली स्थानिक ग्रामीण,नगरी बोली आणि विनोद प्रेक्षकांना आपलेसे वाटत असून सहज,सोपी आणि मनापासून केलेली मांडणी हेच या “पलटी फायर चित्रपटातील मोठे वैशिष्ट्य आहे.
मन मोकळं हसवणारा,ताण-तणाव विसरायला लावणारा आणि कुटुंबासोबत पाहता येईल असा हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. “पलटी फायर” प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे.

हा वेब सिनेमा ‘वाडकरवाणी’ या युट्यूब चॅनलवरही प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे तरी रसिकांनी आपला वेळेत वेळ काढून गाव खेड्याकडील मुलांनी बनवलेला हा चित्रपट पाहण्याची संधी ग्रामीण भागातील मुलांनी आता प्रेक्षकांना दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र मोठे कौतुक होतांना दिसत आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

