
नेवासा –तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे महिलांच्या ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंध व एकल महिलांचे सक्षमीकरण यावर चर्चा झाली. सरपंच सुहासिनी किशोर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महिला ग्रामसभेस माजी सरपंच प्रा.उषा मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य लताबाई सोनवणे, लक्ष्मीबाई गजरे, ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे आदींसह महिला उपस्थित होत्या.

महिला सक्षमीकरण, बाल विवाह प्रतिबंध, एकल महिलांच्या समस्या व उपाय, नवीन आलेले वीज मीटर परवानगी न घेता बसवणे, अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने त्यावर नियमानुसार–काम-व्हावे, वरिष्ठ पातळीवर तक्रारी जाऊ नये यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच एकल महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व तिळगुळ, वाण वाटप करून कार्यक्रम पार पडला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

