नेवासा – श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर दर्शनासाठी आकारले जाणारे पाचशे रुपयांचे शुल्क तात्काळ रद्द करून सर्व भाविकांसाठी निःशुल्क दर्शन सुरू करण्यात यावे, तसेच देवस्थानचे बंद असलेले अन्नछत्रालय व शनैश्वर ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करावे, या मागण्यांसाठी सोमवार दि २६ जानेवारी रोजी धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. देवस्थान प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर सुमारे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
देवस्थानच्या बाबूराव बानकर सभागृहाजवळ दुपारी साडेबारा वाजता सामाजिक कार्यकर्ते अनिल बाबासाहेब निमसे, संदीप अशोक कुसळकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान राज्य व परराज्यातून आलेल्या भाविकांच्या संह्यांची मोहीम राबविण्यात आली.चौथऱ्यावरील दर्शनासाठी आकारल्या जाणाऱ्या
शुल्काबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या दर्शनासाठी पाचशे रुपये आकारणे म्हणजे श्रद्धेवर थेट दरोडा टाकण्यासारखे आहे. सामान्य शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब भाविकांना हे शुल्क परवडत नसल्याने त्यांना चौथऱ्यावर जाण्यापासून रोखले जाते, तर काही ठरावीक व्यक्तींना राजकीय व प्रशासकीय वशिल्याने मोफत दर्शन दिले जाते. ही व्यवस्था आर्थिक व सामाजिक भेदभाव करणारी असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
देवस्थानचे अन्नछत्रालय गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले शनैश्वर ग्रामीण रुग्णालय गेल्या एक वर्षापासून बंद असून, त्यामुळे नेवासा तालुक्यातील गरीब, शेतकरी व अपघातग्रस्त रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून रुग्णालय व अन्नछत्रालयाबाबत प्रशासकीय स्तरावर काम सुरू असून दोन्ही सुविधा मार्च महिन्यात सुरू करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली असल्याचे समजते. पूजेची नियमावली निश्चित करण्याचे काम सुरू असल्याने चौथरा दर्शन शुल्काबाबत तातडीचा निर्णय घेता येणार नसल्याचेही यावेळी स्पष्टत करण्यात आले. या चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा संदिप कुसळकर, अनिल निमसे यांनी दिला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

