जिजामाता महाविद्यालयातील दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
नेवासा- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर अहिल्यानगर आणि मास्तराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय यांच्यातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजिला होता. यात ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली.
या मेळाव्यामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, एमआयडीसी, अहिल्यानगर, अॅक्सिस बँक, सिद्धी सीएनसी एमआयडीसी, अहिल्यानगर, जीएमसीसी, कॅलिबर एचआर बिजनेस, सन रेणुकामाता मल्टिस्टेट को. ऑफ अर्बन क्रेडिट, रेणुका माता रेस्टॉरंट अॅण्ड रिसॉर्ट, संत नागेबाबा मल्टिस्टेट को. ऑप अर्बन, महालक्ष्मी ऑटोमोबाईल,गॅलेक्सी लॅबोरेटरी, स्नेहालय एमआयडीसी अहिल्यानगर, श्रीरामपूर या ११ आस्थापनांमधून महाविद्यालय आणि परिसरातील ३५ उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी पात्र ठरले आहेत. या मेळाव्याच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माजी आमदार पांडुरंग अभंग, आयुक्त रवीकुमार पंतम, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, विश्वस्त डॉ. नारायण म्हस्के, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. संभाजी काळे, डॉ. काकासाहेब लांडे, प्रा. केशव चेके, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता वाकचौरे आणि अन्य सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर आणि विद्यार्थी कर्मचाऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, स्टेशन रोड, इतर मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद आर्थिक विकास अल्पसंख्याक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ही सहा शासकीय महामंडळे उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये प्लेसमेंट अधिकारी म्हणून प्रा. धीरसिंग नाईक आणि समन्वयक डॉ. अब्दुल लतिफ शेख यांनी काम पाहिले. प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

३५२ विद्यार्थ्यांची नाव नोंदणी
रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनियरिंग, आयटीआय पात्रताधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध करून दिली गेली. या मेळाव्यामध्ये ३४० उपलब्ध रिक्तपदे होते. त्यासाठी ३५२ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली. त्यामधील ६९ विद्यार्थ्यांची प्राथमिक आणि ३५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. ही बाब संस्था, महाविद्यालय आणि परिसरासाठी भूषणावह आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

