नेवासा- वरखेड-माका तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेऊर हैबती गावातून जाणाऱ्या अर्धा किलोमीटर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम तातडीने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा अॅड. अजय रिंधे यांनी दिला आहे.
वरखेड ते कुकाणामार्गे माका हा रस्ता तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रयत्नातून करण्यात आला. सुरुवातीच्या तीन वर्षांत बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी जेऊर हैबती येथील नदीच्या पुलाचे काम अनेक वर्षे अर्धवट होते. या संदर्भात ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित केल्याने ते काम मार्गी लागले.
याशिवाय देडगावच्या पुढे एक किलोमीटर काम अद्यापही बाकी आहे. तसेच जेऊर हैबती गावातून जाणाऱ्या अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम पाच वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. गावातून हा रस्ता जात असल्याने धुळीचे साम्राज्य पसरून ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. याशिवाय मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू असून, उसाच्या डबल ट्रेलर तसेच ट्रक यांची रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावरून सुरू असते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

