पाचेगाव फाटा (वार्ताहर) – आजच्या काळात जमिनीचा पोत सुधारून शेती श्रीमंत करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक खते अत्यल्प वापरून सेंद्रिय खतांचा जास्त वापर व पिकाला लागण तेव्हढेच पाणी देऊन शेतीचा पोत सुधारण्यास भर द्यावा असे पाचेगाव ता नेवासा येथील मका पिकास भेट देत कीड व व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांची शेतीशाळा व शेतीदिन कार्यक्रम घेत दहीगावाने येथील शास्त्रज्ञ प्रकाश बहिरट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळी प्रतिपादन केले.
पाचेगाव येथील सोसायटीचे सचिव तसेच शेतकरी संजय उंडे यांच्या मका प्लॉट वर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बरड धान्य मका पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांची शेतीकार्यशाळा व शेतीदिन कृषी विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.त्यात दहीगावाने येथील शास्त्रज्ञ प्रकाश बहिरट, मंडळ कृषी अधिकारी राम ढोकणे,मंडळ उपकृषी अधिकारी सुनीता पुजारी,कृषी सहाय्यक अमोल कांबळे,पाचेगाव येथील कृषी सहाय्यक विकास बाचकर या सर्वांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनावर समाधान कारक उत्तरे देत शेतकऱ्यांच्या पीक समस्येवर काय उपाय योजना करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तुकाराम घोगरे,नचिकेत कुलकर्णी,अनिकेत तुवर,पत्रकार रमेश शिंदे,तुकाराम जाधव,काशिनाथ सुरोसे,राहुल नांदे,राहुल तुवर,राजेंद्र पडोळ,महेश पडोळ,किशोर शिंदे,रामनाथ साळुंके,कचरू पडोळ,रोहित तुवर,बाळासाहेब मतकर,पत्रकार अशोक तुवर यांच्या सह आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

