परदेशातून आलेल्या संशयास्पद मेलमुळे खळबळ; पथकाकडून तपासणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुम्ही ज्या कार्यालयात आहात, त्या ठिकाणी बॉम्ब बसविण्यात आला आहे, असा मजकूर असलेला मेल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मेलवर शुक्रवारी (३० जानेवारी) दुपारी १२:४३ वाजता प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, सदर मेल परदेशी भाषेत असून त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा थेट उल्लेख नसून, युक्रेनमधील १० ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा मेल परदेशातून पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली. या संदर्भात माहिती देताना निवासी जिल्हाधिकारी गीते यांनी सांगितले की,संबंधित मेल चुकून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या मेल आयडीवर आला असण्याची शक्यता आहे. मात्र, मेलमधील मजकूर गंभीर स्वरूपाचा असल्याने कोणताही धोका पत्करला जाऊ नये, बादृष्टीने प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) दाखल केले होते.

पथकाकडून संपूर्ण कार्यालय, आवार, वाहनतळ तसेच आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वीही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला अशाच स्वरूपाच्या बॉम्ब धमक्या मिळाल्या होत्या. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे प्रशासन व पोलिसांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

