नेवासा –तालुक्यातील बकूपिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध देशभक्तीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर देशभक्तीमय केला.
गावच्या सरपंच सौ. सविता ताई लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील बाबासाहेब कानडे पाटील होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच गीतावर आधारित कवायत संचलन व लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली. केंद्र व तालुका पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले

कार्यक्रमादरम्यान संतोष मते (वायरमन), विद्यार्थ्यांना मोफत पाणीपुरवठा करणारे श्री सूर्यकांत मते यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय लबडे, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात, श्री संदीप पातारे, सौ. रुपालीताई साळवे, सौ. दळवी, श्री खंडूभाऊ थोरात, श्री सागर नलावडे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री ससाणे सर यांनी केले
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री राजेंद्र चापे, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री खंडू कोकरे, श्रीमती अश्विनी कदम , श्री सुखदेव पवार व श्री नितीन गायकवाड , यांचे विशेष प्रयत्न केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

