सोनई –शारदाताई फाउंडेशन सोनई व कृषी महाविद्यालय सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील कर्तृत्ववान स्री शक्तीचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये नेवासा तालुक्यातील बचत गट चळवळीत तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून समाजात स्वतःचे एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करणाऱ्या 21 माता-भगिनींना सन्मान करून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी सौ दिपालीताई बारस्कर नगरसेविका महानगरपालिका अहिल्यानगर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तसेच सौ सुनीताताई गडाख अध्यक्ष शारदाताई फाउंडेशन,उषाताई गडाख माजी प्राचार्य आशाताई कर्डिले, प्राचार्य डॉ हरी मोरे डॉ बाबासाहेब शिरसाठ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना दिपालीताई बारस्कर म्हणाल्या स्त्री ही अनंत काळाची माता आहे. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.
नेवासा तालुक्यातील विविध गावामधील महिलांचा मा सभापती सुनीताताई गडाख यांच्या पुढाकाराने महिला दिनानिमित्त विशेष गौरव होतो आहे ही मनस्वी अभिमानाची बाब आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांपासुन ते धार्मिक ,शैक्षणिक क्षेत्रात करणाऱ्या महिलांचा एकाच पुरस्काराने सन्मान करण्यात आला याचा विशेष अभिमान आहे असे बारस्कर म्हणाल्या
सुनीताताई गडाख यांच्या सारख्या कुटूंबप्रमुख तुम्हाला लाभल्या आहेत तुम्ही विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी
स्वतः स्वावलंबी बनावे व राजमाता जिजाऊ यांना आदर्श मानून काम करावे असे त्या म्हणाल्या पुरस्कारार्थी महिलांना व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मा सभापती सुनीताताई गडाख बोलतांना म्हणाल्या आपण काम करत असलेल्या क्षेत्रात सर्वोच्च काम आपण करावे आपली स्वतःची नाविन्यपूर्ण ओळख निर्माण करावी महिला भगिनीनी एकोप्याने काम करत समाज व कुटूंबाच्या प्रगतीस हातभार लावावा असे त्या म्हणाल्या व नेवासा तालुक्यातील महिलांना सदोदित मदतीसाठी कार्यतत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सोनई गावातील महिला भगिनी व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्योती वाघ व वर्षा जाधव घावटे यांनी केले.
महिला दिनानिमित्त शारदाताई फाउंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा गौरव हा पुरस्कार देऊन आमचा विशेष सन्मान करण्यात आल्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्यास मोठी ऊर्जा मिळाली आहे..
– कल्पना लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या चांदा.शेताबांधावर काम करणाऱ्या महिला पासून ते अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेवासा तालुक्यातील 21 महिलांचा कर्तृत्ववान स्त्री शक्ती गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.