नेवासा – दिनांक ०१/११/२०२४ रोजी झालेल्या तिसगांव ता.तिसगाव येथे सायंकाळचे सुमारास मयत कल्याण देविदास मरकड यांचे खुन प्रकरणातील गुन्हा रजि नंबर १०२९/२०२४ नेवासा पोलिस स्टेशन मधील आरोपी नामे अमोल गोरक्ष गारुडकर रा. तिसगांव ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर आरोपी यास जामिन मंजुर झालेला आहे. सदर घटना अशी की, दि.०२/११/२०२४ रोजी सकाळी १०.०५ मिनीटांनी मयत व फिर्यादी व त्याचे भाऊ त्यांचा मित्र असलेला पंकज राजेंद्र मगर याचा मोबाईल नंबरवर फोन आला व तो म्हणाली की, कल्याणचा काही विषय नाही. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की, मला माहित नाही. त्यावेळी फिर्यादी यांना समजले की व त्यानंतर फिर्यादी यांनी मयताचे घर घातले. त्यावेळी फिर्यादी यास समजले की, दि.१/११/२०२४ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचे मित्र पंकज राजेंद्र मगर व इरशाद जब्बार शेख यांना भेटून येतो, असे सांगितले व घरातुन बाहेर पडले होते.

त्यानंतर मयत यांचे चुलत भाऊ याने दि.०२/११/२०२४ रोजी हरविले बाबत फिर्याद दाखल केली होती.
त्यानंतर दि.४/११/२०२४ रोजी संध्याकाळी ५.३४ वाजता फिर्यादी यांचा परिचयाचा असलेल्या व्यक्तीने फोन करुन सांगितले की, तुमच्या भावाची मिसींग बातमी व्हॉटस् ॲप द्वारे प्रसिध्द केली होती त्यानुसार प्रवरासंगम येथील नदीपात्रा मध्ये तुमच्या भावाच्या शरीर यष्टीशी मिळते जुळते प्रेत मिळाले असून तुम्हाला त्याचे फोटो व्हॉटस् ॲपवर टाकले आहे. अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी ते ओळखले व त्यानंतर दि.५/११/२०२४ रोजी सदर आरोपी यांचे विरोधात नेवासा पोलिस स्टेशनला संशय आल्याने कोणत्या तरी अज्ञात हत्याराने अज्ञात कारणावरुन फिर्यादी यांचे भावाचा खुन केला अशा प्रकारे फिर्याद दाखल केली.

त्यानंतर तपासात आढलेला आरोपी नामे अमोल गोरक्ष गारुडकर यांने अॅड. निखील ढोले पाटील याचे तर्फे जामिनासाठी मे. नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे समोर आरोगी यांचे वतीने जामिन अर्ज ठेवला होता सदरचा अर्जावर युक्तीवाद होवुन सदरचा अर्ज आरोपी यांचे वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी याची जामिनावर अटी व शर्तीसह जामिन मंजुर केलेला आहे. तरी आरोपी तर्फे अॅड. महेश तवले यांचे मार्गदर्शनाखाली अॅड. निखील ढोले पाटील यांनी कामकाज पाहिले आहे व यास अॅड. आसिफ शेख यांनी सहकार्य केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.