सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईत महिला दिना निमित्त संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पने कर्तुत्ववान मुलांच्या मातांचा सन्मान व विद्यार्थ्यांच्या मातांचे पूजन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ शोभा सुदाम तागड या होत्या, याप्रसंगी विद्यालयामध्ये विद्यार्थी सायकल स्टॅन्ड, पेविंग ब्लॉक ,सर्व वर्गात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, वर्गातील स्पीकर यांचे उद्घाटन या सत्कारमूर्तींच्या हस्ते करण्यात आले.ज्यांची मुले उपजिल्हाधिकारी सीए . प्रगतशील शेतकरी, आरटीओ, जनरल मॅनेजर, उद्योजक,अध्यात्मिक व अन्य विविध क्षेत्रात उच्च पदावर आहेत व या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत,अशा मातांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला

यामध्ये सौ.शकुंतला बाफना, सौ.मंदाकिनी जरे,सौ.शोभाताई तागड, सौ.छाया गडाख, सौ. संजीवनी शेलार ,श्रीम. आशाताई कर्डिले, सौ.नंदाताई धाकतोडे,सौ. मीराताई निमसे, सौ सुभद्रा दराडे, सौ.सुनीता बनकर, सौ.आशा विरकर, डॉ.रजनी शिरसाठ या महिलांचा कर्तुत्ववान माता म्हणून आला सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माता पूजनासाठी 125 च्या दरम्यान माता उपस्थित होत्या. माता पूजन करत असताना माता व विद्यार्थिनी भावुक झाल्या . याप्रसंगी सौ. सुभद्राताई दराडे यांनी आपल्या मुलाने कशा बिकट परिस्थितीत शिक्षण घेतले हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले त्यांचा मुलगा उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्राचार्या इंदुमती खंडागळे म्हणाल्या माजी खा यशवंतरावगडाख यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले व आईचे जीवनातील महत्त्व किती हे सांगत मंदिरांप्रमाणेच विद्येच्या मंदिरांना सुद्धा देणगीची कशी आवश्यकता असते हे विशद केले व सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रम प्रसंगी सुदाम तागड, जरे ,डॉ बाबासाहेब शिरसाठ, श्री शेलार, दराडे,बनकर ,गडाख, धाकतोडे , भाऊसाहेब निमसे आदी उपस्थित
कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी गडाख, सुंनंदा घाडगे ,निशा होंडे , श्रीम.जंगले, आश्विनी गवळी, दरंदले व्ही.एल. श्रीम. गाडे यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक एकनाथ गवळी पर्यवेक्षक शिवाजीराव कर्जुले आदी उपस्थित होते पाहुण्यांचा परिचय प्रा कैलास गडाख यांनी केला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब दरंदले यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.