ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा

नेवासा – सोनई येथे शनिवारी बसस्थानक परिसरात दोन गटांत शनिवारी हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकासमोरील एका हॉस्पिटलसमोर शनिवारी सकाळी दोन गटांत हाणामारी होत असल्याची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना समजल्याने ते पोलीस पथकासह घटनास्थळी गेले पण तोपर्यंत हाणामारी करणारे युवक पळून गेले होते.

गुन्हा

सीसीटीव्ही टिव्हीच्या आधारे समर्थ संजय तारडे, विनायक विठ्ठल पाटोळे, गणेश भानुदास जाधव, कृष्णा पाटोळे, गणेश सुभाष बनसोडे, अविनाश राजेंद्र पाटोळे, अक्षय दिलीप जाधव,रिहान शेख, सार्थक संजय तारडे (सर्व रा. ब्राह्मणी ता. राहुरी), प्रमोद गणेश ढोबळे, प्रकाश एकनाथ तागड, मोहित ढगे, आदित्य दहिफळे रा. सोनई या सर्वांवर सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर आघाव यांच्या फिर्यादीवरून सार्वजनिक ठिकाणी आपापसात आरडाओरड शिवीगाळ, मारामारी करून शांततेचा भंग केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बी.जी. बाचकर हे करत आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *