नेवासा – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मे पूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे बोर्डाकडून बंधनकारक करण्यात आले आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांबरोबरच पर्यवेक्षकांसाठी देखील सरमिसळ पद्धत अवलंबली. पण, त्याचा फार प्रभाव दिसला नाही. या परीक्षेत भरारी पथकांनी नऊ विभागीय मंडळांतर्गत २०० हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

अजून दहावी-बारावीचा निकाल १५ मे पूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत. १७ मार्च रोजी परीक्षा संपणार आहे.तत्पूर्वी, ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.