नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यात नेहमीच आव्हानात्मक आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा बदल्यांचे चित्र सुरू झाले की काय ?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर सध्याचे धडाडीचे आणि कार्यक्षम अशी प्रतिमा निर्माण केलेले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना नियंत्रण कक्ष (अहिल्यानगर) येथे पाठवण्यात आले आहे.

नेवाशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान आता श्री. खाडे यांचेसमोर असणार आहे.
आज नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार,उपनिरीक्षक भोंबे, उप निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अहिरे, उपनिरीक्षक श्रीमती वैद्य मॅडम, उपनिरीक्षक ससाने, उपनिरीक्षक जरे आणि उप.नि. ढाकणे,तसेच कर्मचारीवर्ग यांचे कडून श्री .खाडे यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.