नेवासा – दिनांक ३१.०३.२०२५ रोजी दुपारी ०७.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील देवगाव गावाचे शिवारामध्ये एका बंपरमधुन वाळु वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने तात्काळ पोसई शैलेंद्र ससाणे, पोना/९७३ बी.बी. काळोखे, पोना/१३८० बाबासाहेब वाघमोडे, पोकों / १०२ वाल्मिक वाघ, पोकों/२७५ संदीप ढाकणे, पोको १६९७ गणेश फाटक अशा पोलीसांचे पोलीस पथक तयार करुन त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत मार्गदशर्न व सुचना देवुन शिताफीने छापेमारी करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमधील मिळालेल्या माहिती नुसार कुकाणा ते देवगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर अशा जाणाऱ्या मार्गावर सापळा रचुन सदरच्या वाहनाचा मागोवा घेतला असता सदरचे वाहन देवगावकडुन एक वाळुने भरलेला डंपर येताना दिसल्याने त्यास पोसई शैलेंद्र ससाणे यांनी सदर ढंपरला हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला असता, सदर ढंपरच्या चालकाने त्याचा इंपर न चांबवता पुढे घेवुन गेला त्यादरम्याण सदर पोलीस पथकाने त्यांच्याकडील वाहनाने इंपरचा पाठलाग करुन काही अंतरावर बंपर पकडुन त्यास थांबवले असता, त्यावरील बंपर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता,

त्याने त्याचे नाव सोमनाथ लक्ष्मण पवार, वय ३६ वर्षे, रा. खडका ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यास वाळु कोठून आणली याबाबत विचारणा केली असता त्याने सदरची वाळु ही गोदावरी नदीच्या पात्रातून आणली असलेबाबत सांगुन त्याबाबत त्याच्याकडे कसलाच परवाना नसल्याचे सांगुन सदर आरोपी हा पासिंग क्रमांक MH १६ AE ०९६१ या क्रमांकाच्या इंपरमध्ये अंदोजे ०३ ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना एकुण १५,४५,०००/- रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याच्याविरुध्द पोकों/वाल्मिक जालींदर वाघ यांनी फिर्याद देवून गुन्हा दाखल केला असुन त्याचा तपास पोना/बी.बी. काळोखे हे करीत आहेत.

तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध वाळु चोरी, अवैध रित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे, अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कठोर कारवाई करण्यात येणार असुन ज्या व्यक्तींवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरुध्द हद्दपार सारखी कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे असे ठणकावून सांगितले.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्रीम. वैभव कलुबमें अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर व उप विभागीय पो. अधिकारी श्री. सुनिल पाटील शेवगाव उपविभाग यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे व धंनजय अ. जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नेवासा यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोना/बी. बी. काळोखे, पोना/बाबासाहेब वाघमोडे, पोकों/वाल्मिक वाघ, पोकों/संदीप ढाकणे, पोकों/गणेश फाटक यांनी केलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.