सोनई – पांढरीचा पुल घाटातील डोंगरावर वसलेल्या प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिराचे रंगकाम करण्यात आले होते. दर्शनासाठी जिल्हाभरातुन भक्तांनी पहाटे पासून रात्रीपर्यत मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले. हनुमान जयंती निमित्त हनुमान मुर्तीस फुला,फळांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते.उत्सव यशस्वी करण्यासाठी दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे महंत भोलागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीने मेहनत घेतली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.