आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
उपनगराध्यक्षा

नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्यावतीने सन २०२५- २६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडे दलित वस्ती कामाचे प्रस्ताव पाठविले नसल्याबाबतची लेखी तक्रार उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

नेवासे नगरपंचायत हद्दीत प्रभाग २ व प्रभाग १६ या अनुसूचित जातीच्या प्रभागासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेतून निधी येत असतो. जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा,नगरपालिका यांनी नियोजन समितीकडे जिल्हा दलित वस्तीच्या निधीतून कामाचे प्रस्ताव पाठवून निधी मिळवून प्रशासकीय मान्यता घेऊन निधीही खर्च केलेला आहे, परंतु नेवासे नगरपंचायतीने जिल्हा नियोजन समितीकडे दलित वस्तीतून होणाऱ्या कामाचा प्रस्ताव न पाठवल्यामुळे ५८ लाख ६५ हजार रुपयांचा निधी हा नियोजन समितीकडे धूळखात पडून आहे.

हा निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवून लवकर मान्यता न घेतल्यास सदर निधी हा अखर्चित म्हणून जाईल आणि त्यामुळे प्रभाग दोन व प्रभाग सोळा या विभागात राहणारे लोक यापासून वंचित राहणार आहेत. नेवासे शहरात सध्या होत असलेल्या पाणी समस्यावर उपाय म्हणून प्रभाग दोनमध्ये मुंबादेवी मंदिराजवळ दोन लाख लिटरची पाण्याची टाकी तयार करावी, जुनी पाणी पुरवठा विहिरीवरून पाईपलाईन करून प्रभाग २ मधील लोकांचा पाणी प्रश्न मिटवावा, असा प्रस्ताव पाठवण्यात यावा तसेच दि.२१ रोजी अजेंड्यावर घेण्यासाठी दिलेल्या विषयात दलित वस्तीतून होणाऱ्या कामासाठी प्रस्तावही पाठविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन उपनगराध्यक्षा सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

उपनगराध्यक्षा

नेवासे नगरपंचायतीसाठीचा दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत निधी जर मिळू शकला नाही तर त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपनगराध्यक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!