सोनई – शनिवारमुळे दि 19 एप्रिल 2025 रोजी कड्याक्याचे ऊन असूनही देशभरातील भाविकांची शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. वहानाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 7 वाजता सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी शनिशिंगणापूर येथे भेट देऊन शनिमूर्तीस तैलभिषेक केला व उदासी महाराज मंदिरात सहकुटूंब पूजा केली. पहिल्यादांचा शनिदर्शनाला शनिशिंगणापूर ला आलो असून शनिदर्शनाने मनाला मोठे आत्मिक समाधान लाभल्याचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग म्हणाले.

देवस्थानच्या वतीने विश्वस्त प्रा आप्पासाहेब शेटे,दीपक दरंदले,सायराम बानकर, सचिन बेल्हेकर,राहुल ढगे ,महावीर चोपडा यांनी बर्फी प्रसाद व शनिशिंगणापूरचा महिमा सांगणारे पुस्तक व शॉल देऊन त्यांचा सत्कार केला
याप्रसंगी संगमनेरचे आमदार आ अमोल खताळ हे उपस्थित होते. शनिशिंगणापूरचे स पो नी आशिष शेळके यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.