सोनई – जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन नेवासा 2025-26 ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.भरत वर्मा व अँड.पांडुरंग औताडे यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यातुन अँड.लक्ष्मण ज्ञानदेव घावटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवारांनी होते यातून अँड.सुनील भाऊसाहेब गडाख यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
महिला उपाध्यक्ष म्हणून अँड.सौ सोनल मयूर वाखूरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव पदाकरिता 2 उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यातून अँड.तुषार काकासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खजिनदार म्हणून अँड.सतीश शेषराव पवार विश्वस्त म्हणून अँड के बी शिंदे , अँड सौ के बी नवले ,अँड टी एस पवार
अँड संदीप कोतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी बारचे जेष्ठविधीज्ञ
एम बी करडक ,एन व्ही लोंढे ,बी ए शिंदे,बी एस गरड,आर डी खिळदकर, ए बी अंबाडे,संदीप शिरसाठ, किशोर ढेरे,अरविंद काळे यांनी सहकार्य केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.