पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील ५१ तरुण भाविकांनी एकत्र येत श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी अयोध्या कडे बुधवार रोजी रवाना झाले आहे. आयोध्या येथे श्रीराम प्रभूचे मंदिर झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याची बऱ्याच तरुण भाविकांची भरपूर दिवसांपासून इच्छा होती. गावातील तरुण वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एकत्र येत धर्मकार्य त्यांच्या हातून घडत आहे. जवळजवळ ५१ जण या ठिकाणी अयोध्येला रवाना झाले आहेत.एकूण आठ दिवसाचा त्यांचा प्रवास असून संपूर्ण प्रवासाचे नियोजन गावातील राम वरघुडे व किरण कोठुळे यांनी केले आहे.

सदर प्रसंगी गावातून प्रवासाला निघताना गावातील ग्रामदैवत श्री हनुमानाची आरती करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व गावातील ज्येष्ठांच्या आशीर्वाद घेऊन हे तरुण अयोध्याला रवाना झाले आहे.गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचा सन्मान करून त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी गावचे सरपंच कृष्णा शिंदे,महिंद्रा साठे, शिवाजी चौगुले, किशोर गटकळ, रवींद्र गटकळ,बापू कांगुणे,नितीन डुकरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.